1.

नर सम्राट या नाटकाचा विषय थोडक्यात सागा​

Answer»

ANSWER:

नटसम्राट' नाटकातली स्वगते हा एक अनन्यसाधारण प्रकार आहे. ही स्वगते प्रेक्षकांना एका वेगळ्याच उंचीवर नेतात. त्यांची अभिरुची समृद्ध केल्याचा साक्षात्कार घडवतात. 'सौभद्र'मधल्या गाण्यांना जे रंजनमूल्य आहे ते नटसम्राटातील स्वगतांना आहे. या स्वगतांमुळे कित्येक वर्षे मराठी रंगभूमीवरून हद्दपार झालेल्या 'लार्जर दॅन लाइफ' व्यक्तिरेखा नाट्यरसिकांना पुन्हा अनुभवायला मिळाल्या. गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, नानासाहेब फाटक, केशवराव भोसले, केशवराव दाते हे गतकाळातले दिग्गज कलावंत या स्वगतांच्या निमित्ताने प्रेक्षकांनी अप्रत्यक्षरीत्या पुन्हा अनुभवले. पुराणवस्तू संग्रहालयाला भेट द्यावी आणि भारवून जावे तशी स्थिती या नाटकातील स्वगताने प्रेक्षकांची केली. या नाटकातील स्वगते काढून टाकली तर ती केशवसुतांच्या भाषेत म्हणतील, 'आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे'... खरोखरच स्वगते वगळली तर नटसम्राटाला गतप्रभ होण्याशिवाय दुसरा मार्गच उरणार नाही.

तुमच्या आमच्या पातळीवरची कौटुंबिकता आणि सारा नाट्यावकाश भेदून टाकणारी उदात्तता यांचे योग्य मिश्रण म्हणजेच 'नटसम्राट' नाटक आणि तेच त्याच्या चिरंतनत्वाचे कारण. नाटककाराच्या या अमोल खजिन्याला डॉ. श्रीराम लागू (आप्पा बेलवलकर) व शांता जोग (कावेरी) यांच्या तितक्याच लखलखीत अभिनयाची साथ मिळाली. मुळातली हिरे-माणकांची दौलत अधिकच उजळून निघाली. 'गोवा हिंदू असोसिएशन'च्या मंडळींनी ही संपत्ती रसिकांना मनःपूत लुटू दिली.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions