| 1. |
मैत्रीचि सुरुवात कथा |
|
Answer» बिर्यानी ललित कला केंद्राचे आजी-माजी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी काफिला नावाचा एक ग्रुप स्थापन केला आणि त्या अंतर्गत त्यांनी 'बिर्यानी' आणि 'टायपिस्ट' हे दोन दीर्घांक नाशिक च्या परशुराम सायखेडकर येथे सादर केले.बिर्यानी हा दीर्घांक प्रथम सादर झाला आणि उत्सुकतेपोटी नाटक बघायला आलेल्या लोकांची इच्छा पूर्ण झाली असे काहीसे वातवरण प्रेक्षागृहात् होते आणि पुढील टायपिस्ट च्या प्रयोगाला तुरळकचं गर्दी दिसली.एकतर बिर्यानी ह्या नावावरुन काहीच चित्र स्पष्ठ होत नवते आणि त्यात प्रेक्षागृहाची प्रसन्नता लोकांना बाहेर लोटत होती. बिर्यानी ही मुळ कादंबरी शिल्पा कांबळे हयांचि आहे आणि ते बसवले आहे सर्वेश गिरे ह्या दिग्दर्शकाने. तर बिर्यानी ही कथा कुरमुरी आणि सकिना ह्यांच्या सर्व धर्म समभाव मैत्रीचि असु शकते किवः सकिना च्या नातवाच्या बर्थडे पार्टीची असु शकते.ही कथा पावडर ची सवय असणाऱ्या आणि मावशीच घर बळकाउ पाहणाऱ्या वाजिरची सुद्धा असु शकते.इथे आपल्याला एक घुली नावाची नृत्यविषारद गाय दिसते.आता हयाचा जमेचा भाग म्हणजे सगळ्या कलाकारांची देहबोली आणि भाषा.त्यावर बरेच काम झालेले आहे.सर्व कलाकारांनी अगदी मनापासून काम केले पण तरी वातवरण निर्मिति करण्यात हे नाटक अपयशी ठरले.त्यात असलेले दोन पात्र म्हणजे कुरमुरी आणि सकिना हयाचे काम उत्तम झाले आहे.आता बिर्यानी चा अर्थ नक्की काय,त्याचा संदर्भ लावणे लोकांना कठिन गेले असावे.नव्या कलाकरांना अशी नाटकं एक संधी असते स्वतःला सिद्ध करायची आणि व्यासपीठ मिळवण्याची.त्या करता ललित कला केंद्राचे आभार आणि कलाकारांचे अभिनंदन व शुभच्छा.
|
|