1.

खालीलपैकली कोणता शब्द कर्मधारय समास नाही?1. सुसंस्कृत2. बाजीराव3. मुक्तद्वार4. दारोदार

Answer» Correct Answer - Option 4 : दारोदार

उत्तर: दारोदार

कर्मधारय समास: ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तित असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारय तत्पुरुष समास म्हणतात.

उदा. नीलकमल - नील असे कमल, महादेव - महान असा देव, रक्तचंदन - रक्तासारखे चंदन

वरील पर्यायांमध्ये सुसंस्कृत, बाजीराव, आणि मुक्तद्वार ही कर्मधारय तत्पुरुष समासाची उदाहरण आहेत.

परंतु 'दारोदार' हा शब्द अव्ययीभाव तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.

अव्ययीभाव तत्पुरुष समास: ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव तत्पुरुष समास असे म्हणतात. 

उदा. घरोघरी, गल्लोगल्ली, गावोगाव



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions