| 1. |
जागतीक महिला दिन निबंधलेखन करा। |
|
Answer» जागतिक महिला दिन हा महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचा, दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक दिवस आहे. ज्या महिलांनी आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या झोळीत एक उज्ज्वल भविष्य टाकले, त्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्या पायवाटेनी पुढे चालणे हे आमच्या सामाजिक संघटनेचे आज आद्य कर्तव्य असावे. आजची पिढी खरे पाहिले तर अनेक अर्थाने खुशहाल आहे. त्यांच्यासमोर प्रश्न नाहीत असे नाही. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. पण ज्या फंडामेंटला राईट्ससाठी त्यावेळी आंदोलने झालीत ती जास्त महत्त्वाची यासाठी होती. जर तुम्हाला तुमचे प्राथमिक अधिकारच मिळणार नाहीत, तर तुम्ही पुढच्या गोष्टींसाठी संघर्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रचंड संघर्षातून मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्याचा आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घेण्याचा हा दिवस आहे. या दिवशी आपण सार्यांनी समाजोपयोगी काम करण्याचा वसा घेण्याचा दिवस आहे. |
|