| 1. |
Guru and shishya story in marathi. NOTE : WRITE IN MARATHI ALPHABETS! Pls ans fast, Its urgent! |
|
Answer» SORRY I won't marathi but it is in hingi I thinck it HELP you Explanation: द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना धनुर्विद्येचे (बाण मारण्याचे) शिक्षण देत होते. या विद्येत शिष्य प्रवीण होऊ लागले. द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मातीचा एक पक्षी आणला आणि तो एका झाडाच्या फांदीवर बांधला. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले. द्रोणाचार्य : झाडावरचा तो पक्षी बघा. बाण मारून त्याच्या डोळ्याचा वेध कोण घेऊ शकेल, ते पाहूया. (युधिष्ठिराला पाहून) पहिली पाळी तुझी. धनुष्याला बाण जोड. त्या पक्ष्यावर नेम धर. युधिष्ठिराने धनुष्याला बाण जोडला आणि पक्ष्यावर नेम धरला. द्रोणाचार्य : आता तुला हे झाड दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ? युधिष्ठिर : मला ते झाड दिसते, आपणही दिसता, हे भाऊही दिसतात आणि हा पक्षीही दिसतो. द्रोणाचार्य : तू पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेऊ शकणार नाहीस. बाजूला हो. मग दुर्योधनाची पाळी होती. त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले. द्रोणाचार्य : दुर्योधना, तुला हे झाड दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ? दुर्योधन : होय, मला हे झाड दिसते. आपण दिसता. माझे भाऊही दिसतात आणि पक्षीही दिसतो. द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला होण्यास सांगितले. |
|