| 1. |
घोड्याच्या शेणाचा उपयोग ? मराठी |
|
Answer» घोडा : मानवाची उन्नती व घोड्याचा क्रमविकास (उत्क्रांती) यांचा परस्पर दृढ संबंध आहे. तसेच मानवाने लढाईत केलेले विक्रम घोड्याच्या सहकार्याशी व बलाशी निगडीत आहेत. घोडा हा प्राणी कामसू व उमद्या स्वभावाचा असून वाहतुकीच्या कामात भार खेचणारा तसाच चपलही आहे. जगातील निरनिराळ्या हवामानांत जगण्याची कुवत त्याच्या ठिकाणी असून तो कुरणात चरून जगू शकतो व यामुळे प्राचीन काळापासून तो मानवाला उपयोगी ठरला आहे. स्वारी, वाहतूक व खेळ यांसाठी तो सर्व देशांत उपयुक्त ठरलेला असून पाश्चात्त्य देशांत शेतीच्या मशागतीच्या कामी त्याचा औतासाठीही उपयोग करण्यात येतो. सर्वच क्षेत्रांत यांत्रिकीकरण वाढल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर तसेच वाहतुकीसाठी मोटारी, विमाने यांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागल्यामुळे घोड्याच्या उपयुक्ततेचे क्षेत्र मर्यादित झाले आहे. सर्व प्रगत देशांत हल्ली शर्यतीपुरताच त्याचा उपयोग होतो. |
|