1.

घड्याळ या शब्दावर मत मांडा।

Answer»

\huge\star\mathfrak\red{{Answer:-}}

घड्याळ

वेळ अमूल्य आहे, वेळ म्हणजेच पैसा; असे आपण खूप वेळा ऐकलं आहे. आपण ठराविक वेळेत शाळेत येतो, ठराविक वेळेचे लेक्चर्स असतात. शनिवारी तर सकाळची शाळा असते, नेहमीपेक्षा लवकर उठावे लागते, नाही का? कल्पना करा जर घड्याळ नसतेच तर, किंवा घड्याळ बंद पडले तर. याच विषयावर मी आज तुमच्या समोर बोलणार आहे.

घड्याळ असण्याचे फायदे

खरंच घड्याळासाठी आपण की आपल्यासाठी घड्याळ हेच कळत नाही इतके आपले जीवन घड्याळाशी बांधले गेले आहे. आपल्या या मनुष्यजन्मात घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे. माणूस जन्मल्यापासून ते मरेपर्यंत त्याचे घड्याळाशी नाते घट्ट असते. आपले जीवन हे घड्याळाच्या काट्याबरोबर बांधलेले असते.

विद्यार्थीदशेत घड्याळ पाहून अभ्यास, खेळ यांची दैनंदिनी बनवली जाते. घड्याळ पाहून शाळेत येणे, जाणे, नाष्टा करणे, एवढेच नव्हे तर जेवण सुद्धा आपण या घड्याळाच्या काट्यावर करतो. म्हणजेच दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्व कामे ही घड्याळावर अवलंबून असतात.

घड्याळाचे काम काय असते? वेळ दाखवणे. किती वाजले, किती तास, मिनिटे झाली. या साध्याश्या यंत्रामुळे आपलं दैनंदिन जीवन सुखकर होते. साल १९२७ मध्ये वॉरेन मार्रीसोन आणि ज.व. हॉर्टन यांनी बेल टेलेफोन लॅबोरेटरी मध्ये क्वार्ट्ज (QUARTZ) घड्याळाचा शोध लावला. क्वार्ट्ज हा एक क्रिस्टल ऑसीलेटर किंवा आंदोलक आहे, जे अतिशय तंतोतंत वारंवारितेसह सिग्नल तयार करते, ज्यामुळे क्वार्ट्ज ची घड्याळे यांत्रिक घड्याळांपेक्षा अचूक सिग्नल्स देतात. क्वार्ट्ज ला सिलिकॉन डायओकसाइड सुद्धा म्हटले जाते आणि हे एक पीएझोइलेक्ट्रिक मटेरियल आहे. या तंत्राने माणसाचे जीवन सुखकर बनवले.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions