1.

Eassy on stri bhrunhatya in Marathi ( for eassy competition)

Answer»

ANSWER:

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा पुरुषप्रधान देश आहे. या देशामध्ये पुरुषांना जास्त महत्व दिले जायचे. परंतु प्राचीन काळामध्ये स्त्रियांना सुद्धा महत्वाच स्थान देण्यात आळे होते. स्त्रीची पूजा केली जात होती. स्त्रीला एक देवीच्या बरोबरीने मानले जायचे.

कालांतराने देशावर विदेशी आक्रमण झाल्यामुळे स्त्रियांची स्थिती गंभीर झाली. स्त्रियांवर भरपूर अन्याय आणि अत्याचार केले जायचे.

विविध कथांमध्ये स्त्रीची भूमिका

परंतु विभिन्न कथांमध्ये देवादिकांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आदिशक्ती म्हणजे स्त्री जातीने शक्य करून दाखवल्या आहेत. अशा अनेक कथा आहेत त्यामध्ये महिषासुराचा वध किंवा सीतेची अग्नी परीक्षा.

आज आपण सर्व धन्प्रपातीसाठी – लक्ष्मीमाता, विद्येसाठी सरस्वती, संकट मुक्तीसाठी – दुर्गा देवीची उपसानाना करतो. परंतु आदिशाक्तींची पूजा करताना आपल्या भारतीय समाजात नवीन जन्माला येणाऱ्या स्त्रीला नाकारतो. तिचा जन्म होण्या आधीच तिची हत्या करतो.

मनुष्याचे वाईट विचार

काही लोकांना वाटायचं कि मुलगा आपल्या वंशाचा दिवा असतो आणि मुलगी दुसऱ्या घराला जाणारी असते. म्हणून काही लोक मुलगी जन्माला येताच तिला मारायचे. त्याच बरोबर देशात विविध प्रथा रूढ होत्या. त्या सर्वाना स्त्रीला सामोरे जावे लागत असे.

विविध प्रथा

प्राचीन काळात भारतीय समाजात बाल विवाह, हुंडा प्रथा, स्त्री भ्रूण हत्या, सती प्रथा इ. विविध प्रथांना सामोरे जावे लागत असे.

काही लोक गरिबीमुळे स्त्रीची हत्या करत असत. तर काही लोक मुलीच्या लग्नाला दिला जाणारा हुंडा नसल्यामुळे तिला मातेच्या गर्भातच मारले जायचे.त्याकाळी स्त्रियांना घरातून बाहेर जाण्याची परवानगी सुद्धा नाही होती.

तिच्यावर फक्त घर सांभाळण्याची जबाबदारी दिली जात असे. स्त्रीला शिकायला सुद्धा शाळेत पाठवले जायचे नाही. प्राचीन काळी स्त्रीला अबला नारी ही संज्ञा दिली जात असे.

Explanation:

PLZ FOLLOW me on BRAINLY



Discussion

No Comment Found