1.

द्वंद्व समासाचे चुकीचे उदाहरण ओळखा1. आईवडील2. चारपाच3. भाजीपाला4. दररोज

Answer» Correct Answer - Option 4 : दररोज

उत्तर: दररोज

स्पष्टीकरण:

द्वंद्व समास: ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात, त्यास द्वंद्व समास म्हणतात.

उदा. आईवडील - आई आणि वडील, चारपाच - चार आणि पाच, भाजीपाला - भाजी, पाला व तत्सम वस्तू

वरील पर्यायांमध्ये 'दररोज' हा शब्द द्वंद्व समासातील नाही आहे.

दररोज हा शब्द अव्ययीभाव समासातील शब्द आहे.

अव्ययीभाव समास: जेव्हा समासातील पहिले पद बहुदा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषण सारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो.

उदा. आजन्म, यथाशक्ती, प्रतिदिन



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions