| 1. |
Advantages of trees in marathi |
|
Answer» जगभरात आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन करण्यासाठी जागरुकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. या नैसर्गिक स्रोतांचा महत्त्वाचा भाग आहे झाड-रोपटे व वन. वनांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनावर भर देणे आता आणखी आवश्यक झाले आहे. एक झाड केवळ सावली आणि ऑक्सिजनच देत नाही तर याचे मूल्य त्यापेक्षा खूप जास्त असते. हे जाणून घेण्याचे सुरुवातीचे प्रयत्न भारतातच झाले होते. १९७९मध्ये कलकत्ता विद्यापीठातील प्रा. डॉ. तारक मोहन दास यांनी एक अभ्यास केला होता. त्यात त्यांनी झाडाचे मूल्य सांगितले होते. डॉ. दास यांनी सांगितले होते की, एक झाड आपल्या ५० वर्षांच्या जीवनात २ लाख डॉलरची सेवा देते. या सेवांमध्ये आॅक्सिजनचे उत्सर्जन, मातीची धूप रोखणे, माती खतयुक्त करणे, पाण्याची पुनर्प्रक्रिया करणे आणि हवा शुद्ध करण्यासारख्या सेवा समाविष्ट आहेत. १९७९ चा महागाई दर लक्षात घेऊन गणना केल्यास एका झाडाच्या सेवांचे मूल्य सुमारे ५ कोटी रु. होते. दिल्लीची एनजीओ दिल्ली ग्रीन्सने २०१३ मध्ये केलेल्या अभ्यासात एक निरोगी वृक्ष वर्षांत जेवढा ऑक्सिजन देतो, तो खरेदी करायचा झाल्यास ही किंमत ३० लाख रुपयांपेक्षाही जास्त होईल. एक-एक झाड अमूल्य आहे. मात्र, झाड लावण्याचे प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत हे यातून दिसते. Explanation: |
|